कुटुंबसंस्था: काही प्रश्न
आजचा तरूण अस्वस्थ आहे, असंतुष्ट आहे. बेभान आहे, बेदरकार आहे, बेजबाबदार आहे हिसंक आहे, विध्वंसक आहे. त्याला कोणतीही बंधने नकोत. त्याला मुक्ती हवी आहे पण ही अराजकवादी मुक्ती आहे. हा बेबंदपणा आहे. हे आजच्या समाजशास्त्रज्ञांचे तरूणाचे विश्लेषण आणि हा राज्यकर्त्याच्या, त्याच बरोबर आईवडिलांच्या डोक्याच्या काळजीचा विषय. उपाय अनेक सुचविले जातात, तरूणांना विधायक कार्यासाठी प्रवृत्त केले …